मी मोदींना व्यक्तिगतरित्या ओळखत नाही – सोनिया गांधी

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ची अवस्थाही ‘इंडिया शायनिंग’सारखी होईल, असं त्या म्हणाल्या आहेत. तर मी मोदींना व्यक्तिगतरित्या ओळखत नाही, पंतप्रधान म्हणून संसदेत अथवा देश-विदेशातील विविध कार्यक्रमांतून त्यांना पाहिलं आहे, असंही सोनियां गांधींनी सांगितलं आहे.

मात्र, यावेळेस त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चांगलीच स्तुती देखील केली. वायपेयींच्या विचारांशी काँग्रेस पक्ष सहमत नसला तरी, वाजपेयी सरकारच्या काळात संसदीय परंपरांचा सन्मान केला जात असे. याबाबतीत मोदी सरकार खूपच मागे पडले, असं सोनिया गांधी म्हणाल्या.