सोनिया गांधी आणि शरद पवार ‘या’ तारखेला नवी दिल्लीत भेटणार

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरूच आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यानंतर तिन्ही पक्षांचे राज्यातले वरीष्ठ नेते आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी भेटले.

तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा जवळ जवळ निश्चित केला असून तो तिन्ही पक्षांच्या वरीष्ठांना मंजूरीसाठी पाठवला जाणार आहे; असं कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या संयुक्त बैठकीला शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे उपस्थित होते.

दरम्यान, या किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 17 तारखेला नवी दिल्लीत भेटण्याची शक्यता आहे. भाजपाच्या राज्यातल्या नेत्यांचीही काल मुंबईत बैठक झाली. सर्व नवनियुक्त आमदार आणि पक्षाला पाठींबा देणारे अपक्ष आमदार या बैठकीला उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या