भैय्या तेजस्वी प्यारा लगेलन ,सुख – दुख में सबसे आगे चललन ; बिहार विधानसभा प्रचार शिगेला

पटना:बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अगदी दणक्यात सुरु झाला आहे. अनेक राजकीय तोफा धडाक्यात बिहार आणि परिसर पिंजून काढत आहेत.या सगळ्या प्रचारात आरजेडी अर्थात लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने नुकतेच आपले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या प्रचारार्थ एक गाणे प्रसिद्ध केले आहे.

भैया तेजस्वी हमार हमनी के प्यारा लागे लन, सुख-दुःख में जनता के साथ सबसे आगे चले लन.. अशा आशयाचे त्या गाण्याचे बोल आहेत.

या गाण्यामध्ये एकंदरीत तेजस्वी यादव यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणगौरव केले आहे.या गाण्यामध्ये तेजस्वी यादव,तेजप्रताप यादव,राबडी देवी आदी लोकं दिसत आहेत.

बिहार विधानसभेत पोहोचण्यासाठी सध्या सगळेच पक्ष अगदी ताकती निशी उतरले आहेत.त्याच प्रचाराच्या रणनीतीचा हा भाग असल्याच बोलले जाते आहे.

महत्वाच्या बातम्या-