सोनम कपूरने साधला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर निशाणा, म्हणाली…

मुंबई : गेले २ महिने संपूर्ण जग हे कोरोनाशी एकजुट पणे लढताना दिसत आहे. अमेरिकेत देखील अनेक नागरिकांचा मृत्यु झाला असतानाचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटवर मात्र  बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर चांगलीच भडकली आणि तिने त्यांच्या ट्विटचा खरपूस समाचार घेतला असल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते की, “मी ब्रिटेन आणि त्यांच्या महाराणीचा चांगला मित्र व चाहता आहे. अस म्हणलं जात होत की शाही कुटुंब सोडणारे हॅरी आणि मेघन हे कॅनडात राहितील. मात्र आता त्यांनी अमेरिकेसाठी कॅनडा सोडले आहे. मात्र अमेरिका त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार नाही. याचा खर्च त्यांना स्वतः ला करावा लागेल.”

सद्याची परिस्थिती मध्ये त्यांचं हे वागणं मात्र सोनमला मात्र चांगलंच खुपल, तिने लगेच ट्विट केले कि, “अमेरिकेच्या जनतेला नक्कीच सध्या लाजिरवाणे वाटत असेल. सध्या जागतिक महामारीने अनेकांचा जीव जात असून ट्रम्प मात्र त्यांचा वेळ मूर्खपणाच्या गोष्टीवर वाया घालवत आहेत.”हे ट्विट सध्या व्हायरल होत असून अनेक नेटीजन्स याला प्रतिक्रिया देत आहे. चीन , इटली पाठोपाठ अमेरिकेमध्ये जास्त मृत्यु कोरोना बधितांचा झाला आहे.