दाभोळकरांची हत्या दुर्दैवी, मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे – सोनाली कुलकर्णी 

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तब्बल पाच वर्षांनी पोलिसांनी यांच्या मारेकऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अद्यापही त्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी ‘जवाब दो’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. ही दुर्देवी बाब असून त्यांच्या खऱ्या मारेकऱ्याचा शोध लागला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केली.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र  दाभोलकरांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. पाचव्या स्मृतिदिनी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथील कार्यक्रमात अभिनेते प्रकाश राज आणि दिग्दर्शक अमोल पालेकर सहभागी होणार आहेत. सकाळी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गीतांमधून अभिवादन करण्यात येईल.

एशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक