लग्नानंतर सोनाली देतीये फिटनेसचे धडे : पहा फोटो

सोनाली

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. नटरंग चित्रपटातून आणि त्या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्याने सोनाली प्रचंड हिट झाली होती. ‘अप्सरा आली’ या गाण्यातून सोनालीने चाहत्यांना मोहिनी घातली. त्याचं बरोबर उत्तम अशा डान्स आणि सौंदर्यानं सोनालीने चाहत्यांना खिळवून ठेवलं.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला बराच प्रतिसाद देतात. सोनाली सोशल मीडियावर फोटो शेअर करताच तिचे चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि कंमेंट्सचा पाऊस पडतात.

नुकताच सोनालीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाली फिट दिसत आहे. आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटमध्ये दोनला जिम लुकमध्ये दिसत आहे. सोनाली या फोटोमध्ये विना मेकअप देखील फार सुंदर आणि फिट दिसत आहे. तिच्या या फिट अंदाजावर चाहते भरभरून कमेंट करत आहे.

सोनाली नुकतीच लग्नबंधनात अडकली तिने तिच्या जन्मदिनाच्या दिवशी अचानक लग्ग्न करून आपल्या चाहत्यांना सुखदः धक्का दिला. सोनाली लग्न अतिशय साध्या पद्धतीने केले. सोनालीने तिचे लग्न चार माणसांमध्ये पार पाडले. सोनाली तिच्या लग्नाच्या दिवशीही अतिशय सुंदर दिसत होती. अगदी साध्या मेकअपमध्ये देखील सोनाली छान दिसत होती.

महत्वाच्या बातम्या 

IMP