fbpx

सोनाली बेंद्रेने केली भावूक कविता पोस्ट, झाली व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये एका दुर्धर आजाराचा सामना करत होती. या आजारातून ती सध्या सावरत असून या घटनेला आता १ वर्ष पूर्ण झाले आहे. अशी भावूक पोस्ट सोनालीने सोशल मिडीयावरून आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत त्यांचे आभार मानले आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शो मध्ये ती परीक्षक होती. ‘हम साथ साथ है’, ‘सरफरोश’, ‘लज्जा’, ‘दिलजले’, ‘मेजर साहब’ यासारख्या चित्रपटांतून तिने अभिनय केला आहे.

सोनाली बेंद्रेने ट्विटरवरच्या माध्यमातून, भावनिक कविता पोस्ट
ट्विटरवरील भावनिक पोस्टमध्ये तिने लिहिलं की,
‘कठीण काळात खंबीरपणे रहा, त्या वेदनेतून फुलं फुलवा…
माझ्या आतील फुलांना उमलण्यास तुम्ही केली मदत … ही फुले आणखी उमलतील…
आणखी वेगाने…हळूवारपणे…तुम्हाला जेव्हा गरज भासेल… फुलासारखे उमलत राहा………

या घटनेला एक वर्षे पूर्ण झालं आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहात, हे मी सांगू नाही शकत. मला यातून बाहेर काढण्यासाठी व माझी मदत करण्यासाठी मी सर्वांचे आभार मानते.