सोनाक्षी सिन्हा होणार सलमान खानच्या कुटूंबाची सून?

सोनाक्षी सिन्हा होणार सलमान खानच्या कुटूंबाची सून?

sonakshi sinha ,salman khan

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha ) ही लोकप्रिय असून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या रिलेशनशिप किंवा तिच्या लग्नाच्या चर्चा झाल्या नाही. मात्र, आता अशा चर्चा आहेत की लवकर शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा ही सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेवाशी लग्न करणार आहे. यामुळे बऱ्याच चर्चा रंगत आहेत.

दरम्यान माध्यमातील वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हा ही सलमान खानच्या (Salman Khan) परिवारातील एका सदस्याशी अगदी जवळ आहे, तसेच त्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे. सलमान खानच्या परिवारातील या सदस्याचे नाव बंटी असे आहे. सोनाक्षी आणि बंटी यांच्या लग्नाची तयारी चालू झाली आहे. बंटी हा सलमानचा छोटा भाऊ सोहेल खानचा मेव्हणा आहे. सोनाक्षी आणि बंटी यांची खूप चांगली मैत्री आहे, अनेकवेळा ते एकत्र स्पॉट होतात. एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले होते की, जेव्हा ती शाळेत होती तेव्हा तिला खरे प्रेम झाले होते. परंतु ग्रॅजुएशन पूर्ण होताच तिचे ब्रेकअप झाले. तिने सांगितले की, हे रिलेशन तिने खूप सिरिअसली घेतले होते. ती पूर्ण पाच वर्ष रिलेशनमध्ये होती. परंतु सोनाक्षीने त्या मुलाच्या नावाचा खुलासा केला नाही. तरी देखील आता सगळेजण असा अंदाज लावत आहेत की, तो मुलगा इतर कोणी नाहीतर बंटी सचदेवा (Bunty Sachdeva) हा आहे. तसेच सोनाक्षी आणि बंटीची खूप चांगली बॉंडिंग आहे. अनेक पार्टीमध्ये ते दोघे एकत्र स्पॉट झाले असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सोनाक्षी सलमान आणि त्याच्या कुटुंबाशी खूप जवळ आहे. सलमान खानचे वडील सलीम खान आणि शत्रुघन सिन्हा खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे आता बंटी आणि सोनाक्षी लवकरच लग्न करणार आहेत अशा बातम्या येत आहेत. सलमान खानने सोनाक्षीला चित्रपट सृष्टीत लॉन्च केलं आणि आता सोनाक्षी त्याच्या कुटुंबाचा एक भाग होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. खरतरं या विषयी अजून कोणीही काही स्पष्टीकरण दिलं नाही आहे. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

सोनाक्षी सिन्हाचे काही ग्लॅमरस फोटो पहा.

 

महत्वाच्या बातम्या