मराठा आरक्षण : सोनईमध्ये तीन दिवसांपासून ठिय्या !

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात हिंसेचा आगडोंब उडाला आहे. तर राज्यात काही ठिकाणी लोकशाही मार्गाने सरकारी कार्यालया समोर ठिय्या मांडून मराठा तरुण आपल्या मागण्यांवर अडून आहेत.

मराठा समाजाला आरक्षण तत्काळ द्यायला हवं : एकनाथ खडसे

नेवासा तालुक्यातील सोनई येथे गेल्या तीन दिवसंपासून कृष्णा दरंदले, अमोल चव्हाण, संदीप लांडे , अविनाश दरंदले, अनिकेत दरंदले, सोमा तांबे यांच्यासह अनेक तरुणांनी ठिय्या मांडत आंदोलन सुरूच ठेवले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जल समाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या निधनानंतर आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. मात्र दुसरीकडे हिंसेच समर्थन न करत सोनईमधील या तरुणांनी लोकशाही मार्गातून आपलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करावे : प्रवीण गायकवाड

Loading...

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची माफी मागावी : अशोक चव्हाण

Loading...

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

Loading...
  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

2 Comments

Click here to post a comment