सोनई हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू

sonai hatyakand

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांड प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या सहा आरोपींपैकी एकाचा शनिवारी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. पोपट रघुनाथ उर्फ विश्वनाथ दरंदले (वय ५५) असे मृत आरोपीचं नाव आहे.

गेल्या चार महिन्यांपासून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. नाशिकरोड कारागृह अधिक्षक राजकुमार साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट दरंदलेची प्रकृती गुरुवारी बिघडली होती. त्यामुळं त्याला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होत.

काय सोनई हत्याकांड ?

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे १ जानेवारी २०१३ रोजी प्रेमप्रकरणातून तिहेरी हत्याकांड झाले होते. या प्रकरणाचा निकाल नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरु आहे. या घटनेत संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे अशी हत्या करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी सीमा ही नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी.एडचे शिक्षण घेत होती.संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणा-या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि सीमा यांची ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत दरंदले कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले.

सीमाचे वडील व गुन्ह्यातील संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण दरंदले (भाऊ), संदीप कु-हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक फलके व अशोक नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील शौचालयाच्या सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप थनवार, सचिन घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले होते.संशयितांनी अचानक हल्ला करत संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. पळून जाणा-या राहुल कंडारे याच्यावर कोयत्याने वार करून तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

घटनेतील सात संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकत्यार्चे मुद्दे, म्हणणे ग्राह्य धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.

महाराष्ट्र हदरवणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 15 जानेवारीला

बहुचर्चित सोनई हत्याकांडाप्रकरणी ६ संशयित दोषी

सोनई हत्याकांडात सहा आरोपींना फाशीच !

 

1 Comment

Click here to post a comment







Loading…




Loading...