fbpx

करणीच्या संशयावरून वृध्द आईस मुलाकडून बेदम मारहाण

mother,son,attack,sangali

घरावर करणी व भानामती करीत असल्याच्या संशयावरून वृध्द आईस रात्रभर बेदम मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार कुंभारगाव (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे घडला आहे. याबाबत संबंधित वृध्देच्या मुलासह सून व नातू अशा तिघांविरोधात जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमती तुळसाबाई नामदेव माने (वय ६५, सध्या रा. शिरोळ) असे या दुर्देवी आईचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मुलगा नाथा माने, सून सुमन माने व नातू दत्ता माने या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जखमी श्रीमती तुळसाबाई माने यांच्यावर जयसिंगपूर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मूळचे माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील हे माने कुटुंबिय आहे. श्रीमती तुळसाबाई माने यांचा एक मुलगा संजय माने हा शिरोळ, तर दुसरा मुलगा नाथा हा कुंभारगाव येथे राहतो. श्रीमती तुळसाबाई माने या शिरोळ येथील मुलाकडे असतात. काही दिवसापूर्वी नाथा माने याचा मुलगा दिगंबर माने याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यानिमित्त श्रीमती तुळसाबाई माने कुंभारगाव येथे आल्या होत्या. अंत्यविधी कार्यक्रम उरकल्यानंतर नाथा माने व त्याच्या कुटुंबाने आई श्रीमती तुळसाबाई माने यांना तूच आमच्या घरावर करणी केली आहेस, भानामती केली आहेस, असा आरोप करीत काठी व पठ्ठ्याने बेदम मारहाण करून घरातून हाकलून दिले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या श्रीमती तुळसाबाई माने यांनी कसेतरी शिरोळ गाठले. आईची ही परिस्थिती पाहून दुसरा मुलगा संजय माने यांनी त्यांना जयसिंगपूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी श्रीमती तुळसाबाई माने यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात मुलगा, सून व नातू अशा तिघांविरोधात ङ्गिर्याद दाखल केली असून जयसिंगपूर पोलिसांनी हा गुन्हा चिंचणी (वांगी) पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे

1 Comment

Click here to post a comment