मराठा क्रांती मोर्चा : कधीतरी या जातीपातीच्या राजकारणात आपला श्वास बंद होईल – केदार शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्य बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीबाबत प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विट करत नवा वाद ओढून घेतला आहे. कधीतरी या जातीपातीच्या राजकारणात आपला श्वास बंद होईल, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या बंददरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केले होते. मात्र, सकाळी ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली. त्यामुळे ‘आरक्षणापेक्षा आपलं रक्षण महत्त्वाचं आहे. कोणाकडून अपेक्षा ठेवायची?’, असा सवाल केदार शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मराठा क्रांती मोर्चा : मुंबई बंद स्थगित

मराठा ठोक मोर्चा : औरंगाबाद मध्ये इंटरनेट सेवा बंद

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
You might also like
Comments
Loading...