राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ईडी कारवाईबाबत बोलताना एक सूचक विधान केलं आहे. कुठंतरी काहीतरी शिजत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. विरोधक हा दिलदार असायला हवा नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मज्जा कशी येणार, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं असून अप्रत्यक्षरित्या त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
देशात जास्त केसेस या विरोधीगटातील नेत्यांवर आहेत. मध्यंतरी एक बातमी आली होती कि विरोधीगटातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त जणांवर केसेस आहेत. जे कोण केंद्रसरकारच्या विरोधात बोलतयं त्यांच्यावर लगेच ईडीची कारवाई केली जात असल्याचं त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
“अजितदादा, मी पण पंढरपुरातल्या संघाच्या शाखेत जायचो”, असं विधान काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील शहाजी बापू पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. शहाजी बापू पाटलांना वाटतं तसं ते बोलतात. दादा म्हणतो ना ज्या झाडाला आंबे असतात त्यालाच माणसं दगड मारतात, बाभळीच्या झाडाला कोण मारते का? कायतरी असेल म्हणून रोज टीका करतात ना?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शिवसेनेचं चिन्ह असणाऱ्या धनुष्यबाणा बाबत सुनावणी झाली. यावर देखील सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसपासून वेगळा झाला. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. तरीही आम्ही निवडणूक जिंकलो होतोच कि. शिवसेनेचं चिन्ह जरी गोठवलं किंवा ते मिळालं नाही. तरी कोणत्याही संघटनेला आपलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं फार आवघड होणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | ‘दोन दसरा मेळावा होत असल्याचे दु:ख’ म्हणणाऱ्या रामदास कदमांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार म्हणाल्या…
- Hair Care Tips | कढीपत्त्याने केस नैसर्गिकरित्या करा काळे, जाणून घ्या प्रोसेस
- Girish Mahajan | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला भाजप नेत्यांची उपस्थिती? गिरीश महाजनांनी दिलं उत्तर, म्हणाले…
- Raosaheb Danve : “तुम्ही आहात एमआयएमचे पण वाटता भाजपचे”; दानवेंचा इम्तियाज जलील यांना टोला
- Eknath Shinde vs BJP | भाजपच्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदेंनी भर स्टेजवर दिला होता राजीनामा! जाणून घ्या काय आहे प्रकरण?