जॅकलिनने केलं असं काही की, पुणे पोलिसांनी मानले आभार

जॅकलिन

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याची खबरदारी म्हणून काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले तर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी गरजू व्यक्तिना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. सोनू सूद, अजय देवगण, सलमान खान, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक कलाकार आपापल्यापरीने मदत कार्य करत आहेत. यावेळी गरजू व्यक्तिंच्या मदतीसाठी आता जॅकलीन फर्नांडिस देखील पुढे आली आहे. गरजवंतांना जेवण पुरवण्यासाठी जॅकलीनने ‘योलो फाउंडेशन’ची स्थापना करत याद्वारे मदत पुरवत आहे. ज्यातून ती लोकांच्या लॉकडाऊन स्टोरीज सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

तिच्या याच कार्याला सलाम करत पुणे पोलिसांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये लिहिले, ‘पुणे पोलिसांच्या टीमसाठी जॅकलिन फर्नांडिसचं योगदान कौतुकास्पद आहे. तुमच्या या योगदानासाठी खूप आभार. तुम्ही करत असलेली मदत फ्रंटलाइन वर्कर्सना प्रोत्साहन देईल.’

पुणे पोलिसांच्या या ट्वीटनंतर जॅकलिन देखील रिट्विट करत म्हणाली, ‘मी पुणे पोलिसांच्या कामाला सॅल्यूट करते. जे फ्रंटलाइनवर लोकांच्या सुरक्षेसाठी खूप मेहनत घेत आहे. करोनाच्या या संकटाशी लढण्यासाठी आपलं योगदान देत आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ असे म्हणत तिने पुणे पोलिसांना सॅल्यूट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP