काय घडलं त्या रात्री?; मिका सिंगच्या मदतीला धावले मुंबईकर

मिका सिंग

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका बॉलिवूड गायक मिका सिंगला देखील बसला आहे. सोशल मिडीयावर सध्या त्याचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिका गाडीत बसलेला असून त्याच्यासोबत अभिनेत्री आकांशा पुरी देखील आहे. बरेच लोक पावसात भिजत मिकाची मदत करण्यासाठी पुढे धावून आले.

मिका आणि आकांशा राहुल वैद्यच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये गेले होते. जवळपास रात्री ३ वाजता ते पार्टीमधून घरी परतत होते. त्यावेळी अर्ध्या रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली. त्यात जोरदार पाऊस आणि रस्त्यावर साचलेलं पाणी त्यामुळे त्याला गाडीबाहेरही पडता येत नव्हतं. अशा वेळी रस्त्यावरील सर्व लोक त्याच्या मदतीला धावून आले. त्यांनी जोरदार पावसात भिजून त्यांची मदत केली. त्यांनी गाडीला धक्का दिला. आणि गाडी सुरु झाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. मदत करणाऱ्या या सर्व चाहत्यांचे मिका सिंगने मनापासून आभार मानले आहेत.

तसेच काही दिवसांपासून बॉलिवूड गायक मिका सिंग आणि केआरकेमध्ये वाद सुरु आहेत. केआरकेने सोमवारी त्याच्या युट्यूब चॅनलवर ‘सुअर’ नावाने एक गाणं प्रदर्शित केले होते. या आधी मिकाने ११ जून रोजी ‘केआरके कुत्ता’ हे गाणं प्रदर्शित केलं होतं. त्यानंतर मिका सिंग आणि केआरकेमध्ये सतत वाद सुरु असल्याचे दिसते.  त्यानंतर केआरकेने देखील मिका सिंगवर एक गाणं तयार केलं होते. केआरकेच्या त्या गाण्यावर कारवाई करत युट्यूबने केआरकेच्या युट्यूब चॅनलला एक आठवड्यासाठी ब्लॉक केले होते. हे पाहता केआरकेने युट्यूबवर निशाणा साधत मिका सिंगसोबत असे का केले नाही असा प्रश्नही विचारला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP