मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यावरच उप मुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी प्रतिक्रिया देत शंका व्यक्त केला आहे.
चिथावणीखोर भाषा कुणी वापरली? त्यांच्या भावना कुणी भडकवल्या? नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातल्या. हे लोक असा विचार करणारे नाहीत. पण कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. ते शोधून काढण्याचं काम पोलीस विभागाचे आहे. दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. लवकरच कुणी हे केलं याचा तपास लागेल. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
तसेच अगोदर जल्लोष करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नंतर सिल्व्हर ओकवर आंदोलन का केले. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तिथे गुलाल उधळला गेला. तिथे मिठाई वाटली गेली. खूप मोठं यश मिळवलं असं दाखवलं गेलं. मग एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्व्हर ओकवर जाण्याचं कारण काय? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: कोच नेहराने सांगितला गुजरातच्या विजयाचा फॉर्म्युला; म्हणाला ‘खाओ पीओ…’
“…तर त्याला शरद पवार, वळसे पाटील जबाबदार”, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री यांचा गंभीर आरोप
“आता अशी माणसं दुर्मीळच झाली आहेत”, संजय राऊतांची प्रतापभाई आशर यांना श्रद्धांजली
IPL 2022: सर्वात रोमांचक सामन्यात बनले अनेक विक्रम; धवनने रचला इतिहास तर गिलने गाठला ‘हा’ टप्पा
“…यानंतरही कुणाच्या इशाऱ्यावर हे सगळं घडल?”, सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी मिटकरींचा सवाल