कथप्पाने घेतला ‘ढींच्याक पूजाच्या’ व्हिडीओचा बळी

dhinchak pooja

विरेश आंधळकर : कटप्पाने बाहुबलीला का मारल याच उत्तर सर्व जगाला आता मिळाल आहे. मात्र आता कटप्पाने अजून एक अशी गोष्ठ केली आहे ज्यामुळे पुन्हा एकदा सर्वाना मोठा प्रश्न पडणार आहे आणि तो म्हणजे ‘कथप्पाने’ ‘ढींच्याक पूजाच्या’ व्हिडीओचा बळी का घेतला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काय प्रकरण आहे.

‘ढींच्याक पूजा’ आपल्या बेसूर आवाजात गायलेल्या गाण्याने सोशल मिडीयावर रातोरात स्टार झालेली मुलगी. ‘मेरे दिलोका स्कूटर’ ‘सेल्फी मैने लेली ‘ हे ढींच्याक पूजाचे गाजलेले व्हिडीओ . हे व्हिडीओच आतापर्यत लाखो लोकांनी युट्युबवर पाहिले आहेत .dhinchak pooja video gone from youtube

मात्र आता तुम्ही  युट्युबवर जाऊन हे गाण पहायचं म्हणल तर ते तुम्हाला दिसणार नाही. कारण हे गाण युट्युबवरून हटवण्यात आल आहे. कॉपीराईट कंटेंटच्या नोटीसमुळे युट्युबने हे गाण हटवल आहे. आणि याला कारणीभूत आहे ‘कथप्पा सिंग’ या नावाची व्यक्ती. या व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार ढींच्याक पूजाने गायलेली  गाणी आणि त्याचे व्हिडीओवर यावर त्यांच्या अधिकार आहे. त्यामुळे कटप्पा सिंग यांच्या दाव्यानंतर युट्युबने  हे व्हिडिओ हटवले आहेत .

kattapa strike dhinchak pooja

 

हे  व्हीडोओ हटवल्यानंतर आता सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यामध्ये आता तुम्ही तुमच्या मित्रांना ढींच्याक पूजाचे गाणे ऐकवून संताप अणू शकणार नाही . त्याच प्रमाणे देशाला पूजाच्या बेसुऱ्या आवाजापासून सुटका मिळाल्याचे जोक सोशल मिडीयावर फिरत आहेत. तर काहींनी हे व्हिडीओ हटवण्यात आल्याने दुःख देखील व्यक्त केलं आहे.,

dhinchak pooja songs deleated from youtube