शहरवासीयांना काहीप्रमाणात दिलासा! तर ग्रामीण भागात कोरोनाचा धोका कायम

corona

औरंगाबाद : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा तेवढी मजबूत नसल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेवरच याचा मोठा भार पडत आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ९,२१५ रुग्ण अधिक आढळले आहेत. तर दुसरीकडे मृत्युदरातही अधिक वाढ झाल्याने चिंता कायम आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी रोजचे हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने बेड्सची समस्या निर्माण झाली होती. घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन कोविड सेंटरसह शहरातील खासगी रुग्णालये देखील कोरोना रुग्णांनी फुल्ल झाली होती. दरम्यानच्या काळात संचारबंदी, कडक निर्बंध यांमुळे शहरातील रुग्ण संख्या कमी होण्यात

परिणामी, मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येत घट झालेली पहायला मिळते आहे. मात्र असे असले तरी मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात जिल्ह्यात अधिकचे रुग्ण आढळल्याचे प्रशासनाकडून प्राप्त अहवालातून समोर आले आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात एकूण ३२,३१३ कोरोनाबाधित आढळले होते. तर ४०२ बाधितांचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात मात्र आजर्यंत दरमहा आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे तब्बल ४१, ५२८ रुग्ण आढळून आले आहेत.

मार्चमध्ये नव्याने ३२,३१३ बाधित आढळले होते. तर १८,६४० रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट हा शंभर टक्क्यांपेक्षाही अधिक नोंदला गेला आहे. एप्रिल महिन्यात आढळलेल्या ४१,५२८ रुग्णांच्या तुलनेत ४४,०६२ बाधित उपचारातून बरे झाले आहेत. त्यामुळे ही बाब दिलासादायक मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या