पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य माणूस चांगलाच होरपळून निघत आहे. महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल -डिझेलचे वाढते दर. सलग सातव्या दिवशी होणाऱ्या इंधन दरवाढी नंतर आज 12 ऑक्टोबर रोजी तेलाच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी देखील स्थिर आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 104.44 रुपये प्रति लिटर तमुले र डिझेल 93.17 रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत 110.41 रुपये प्रति लिटरच्या सर्वोच्च स्तरांवर आहे. तसेच मुंबईत डिझेल आता 101.03 रुपये प्रति लिटर आहे. .पेट्रोल-डिझेलचे  सर्वाधिक दर मुंबईत आहेत. वाढत्या इंधन दरवाढीमुळे देशभरात आंदोलन करण्यात आली. मात्र याचा कोणताही परिणाम झाला नसून पेट्रोल – डिझेलचे दर वाढतच आहेत.

कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असून उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होते.

दरम्यान, सततच्या वाढत्या किमतीमुळे आता डिझेलने देखील शंभरीकडे वाटचाल केली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती आधीच शंभरी पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलने देखील काही भागात शंभरी गाठली आहे.

महत्त्वाच्या बातम्या