काही लोक फक्त बोलघेवड्या सारख बोलतात, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाना

पुणे : काही लोकांना काही करायचं नसत किंवा दाखवायचं नसत त्यामुळे ते बोलघेवड्या सारखे बोलतात, लोकांची सभा जिंकायची असते आणि निघून जायचं असं चालत नाही, म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. यावेळी पवार यांनी पाणी फाऊंडेशनच्या कामाबद्दल आमीर खान यांना कौतुकाची थाप देखील दिली.

आमीर खान तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन कोणाचा शिक्का मारून घेवू नका. तुमच्यावर कोणाचा शिक्का नाही म्हणून ही जनता आज तुम्हाला प्रतिसाद देत असल्याच यावेळी अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आधी बोलत असतांना राज ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राला स्वतंत्र होवून ६० वर्ष झाली. मात्र, आजवर सिंचनावर खर्च केलेला पैसा कुठे गेला असा सवाल केला होता.

टाकेवाडी आंधळी गावाला पहिला क्रमांक

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा सातारा जिल्हातील मान तालुक्यात असणाऱ्या टाकेवाडी आंधळी या गावाला पहिला क्रमांक मिळाला आहे, तर सातारा जिल्हातीलच भांडवली आणि बुलढाणा जिल्हातील सिंदखेड या गावांना संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळाला आहे.

‘आधी जनतेतून निवडून या, मग निवडणूक आली की पवारांना जात आठवते असं म्हणा’