‘काही लोकांची बुद्धी थोडी कमी असते, त्यामुळे..’, ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे प्रत्युत्तर

पणजी : मुंबईत एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं” विधान केलं होत. त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. अनेक राजकीय नेते या वक्तव्यावर टीका टिप्पणी करू लागले आहेत.

यावर पणजी येथे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘टिका करणाऱ्यांनी माझं वाक्य जर पुर्ण ऐकलं असतं. तर अशा प्रकारची टीका केली नसती. मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्यासोबत जे लोकं आहेत. या लोकांनी मला असं कधी वाटू दिलं नाही (मुख्यमंत्री नाही). त्यांचा खंबीर पाठिंबा माझ्यासोबत आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे, हे मी सांगितलं. पण काही लोकांची बुद्धी थोडी कमी असते. ज्यांची बुद्धी कमी असते त्यांना वक्तव्य समजल नाही. त्यामुळे कमी बुद्धीच्या लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर मी बोलणार नाही’.

दरम्यान, फडणवीस यांच्या त्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते की, ‘कधीकधी लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी हे नाटक फार गाजलं. रंगमंचावर आम्हालाही दिल्लीत गेल्यावर असं वाटतं त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसाने, चांगली स्वप्ने पहावीत, स्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखाना ताकद यावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं’. असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे. मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असं फडणवीस म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या