मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीसमोरील भोंग्याबाबत ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. त्यानुसार त्यांच्या अल्टीमेटमची मुदत आज (४ मे) संपली आहे. दरम्यान राज ठाकरेंची भूमिका आणि मनसेचे आंदोलन यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“काही लोक राजकारणात हौशे, नवशे, गवशे असतात. त्यांना कुठूनतरी राजकीय बळ मिळत असतं. त्यातून असे प्रसंग निर्माण होतात. मात्र राज्यात ठाकरे सरकार आहे. जरी आघाडीचं सरकार असलं, तरी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरील नमाजा बाबतीत काय करावं आणि मशिदीवरील बेकायदा भोंग्यांबाबत कोणता निर्णय घ्यावा याचे सल्ले दुसऱ्यांनी द्यायची गरज नाही.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान मनसेच्या आंदोलन यासंदर्भात संजय राऊत यांनी म्हटले की, ”मला कुठेही आंदोलन दिसून येत नाहीये. मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदेशीर भोंगेच नसतील आणि उलट तुम्ही बेकायदेशीर भोंगे लावत असाल, तर तुम्ही आंदोलन करताय की दुसरं काही कृत्य करताय हे ठरवा. आंदोलनाचा सर्वाधिक अनुभव देशात फक्त शिवसेनेला आहे. त्यामुळे आंदोलनं कशा प्रकारे करावीत हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या:
- “राज ठाकरेंना अटक करून दाखवाच”; सदाभाऊ खोतांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
- “अनाधिकृत भोंग्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत नसल्याने मविआ…”, केशव उपाध्येंचा टोला
- “काही ठिकाणी कमी आवाजात तर काही ठिकाणी भोंग्याविना नमाज पठन”, सामाजिक सलोख्याचे घडले दर्शन
- “मविआ सरकार राज ठाकरेंनाही निश्चितच तुरुंगात डांबेल”, चंद्रकांत पाटलांचा टोला
- “ज्यादिवशी आमचे सरकार महाराष्ट्रात येईल…”, राज ठाकरेंनी केला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ ट्वीट