राज्यातील अजून काही बडे नेते आणि त्यांची मुलं संपर्कात – महाजन

जळगाव: नगरमध्ये विरोधीपक्ष नेते सुजय विखे पाटील आणि आता सोलापूरचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता राज्यातील आणखीन काही बडे नेते आणि त्यांची मुलं भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

Loading...

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर इतर पक्षांमधून भाजपात इनकमिंग वाढले आहे. विशेष आगील आठवड्यात प्रवेश केलेलं सुजय विखे आणि आता रणजितसिंह मोहिते पाटील यांची घराणी हि राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा असणारी आहेत. तर पुत्रांनी प्रवेश केला तरी विखे आणि मोहिते पाटील पित्यांनी मात्र शांत राहणे पसंत केल्याच दिसत आहे.

दरम्यान, लोकांचा भाजपवर विश्वास वाढला असून सुशिक्षित पिढी आमच्याकडे येत आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.Loading…


Loading…

Loading...