मराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दुखः व्यक्त केलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरून काही लोक राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भोसले यांनी केली आहे. मेरठ विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या मनसे आणि शिवसेनेला हा टोला त्यांनी लगावला आहे.

नेमकं कांय म्हटलं आहे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ?

मी आज संपूर्ण शिवाजी महाराजांचे वातावरण पहात आहे. उत्तर भारतीय लोक शिवाजी महाराजांना महाराष्ट्रासारखेच मानतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजचे स्वप्न पाहिले होते जे संपूर्ण देशाच्या प्रत्येक समाजासाठी होते. मेरठमध्ये मराठी माणूस व्यवसाय करतो त्यावेळी त्यांन काही अडचण येत नाही, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात उत्तर भारतीय लोकांना व्यवसाय करताना कोणतीही समस्या उद्भवू नये.काही लोक या विषयातून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात हे चुकीचे आहे .

दरम्यान,या कार्यक्रमाला राज्यपाल राम नाईक, मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह आणि मेरठ विद्यापीठाचे कुलपती उपस्थित होते. ‘उत्तर भारत मराठी समाज’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.