काही नेत्यांना सेक्युरिटीची हौस; अब्दुल सत्तारांचा भाजप नेत्यांना टोला

badul sattar

वर्धा : राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वात लक्षणीय बाब म्हणजे राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी खासदार नारायण राणे यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून सद्या राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील या वादावर भाष्य करून भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात गेले असता त्यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे. काही नेत्यांना सिक्युरिटीची जास्त हौस आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘महाविकास आघाडी सरकारने नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. सुरक्षा काढलेली नाही. सुरक्षा कमी करण्याची सुरुवात भाजपनेच केली. दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर यांनीच सिक्युरिटी कमी करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या सिक्युरिटी काढल्या. भाजप नेत्यांना दोन नेत्यांची सिक्युरिटी काढल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटत आहे. दिल्लीत सरकारमध्ये बसल्यानंतर यांनीच विरोधी पक्षांची झेड प्लस, वेगवेगळ्या कॅटेगरींची सिक्युरिटी काढली होती.’ अशी आठवण देखील त्यांनी भाजपला करून दिली आहे.

तर, ‘काही लोकांना जास्त सिक्युरिटीची हौस आहे. कोरोना काळात पोलीस मोठं काम करत आहेत. कोरोना संकटामुळे सिक्युरिटी कमी करण्यात आली. या विषयात राजकीय संबंध नाही.’ असा खुलासा देखील अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP