fbpx

काहींना उकिरड्यावरुन राजकारणात आणले, तेच उपकार विसरुन गेले – एकनाथ खडसे

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा – आजच्या परीस्थित राजकारणाचा विचार केला तर, राजकारणात आज बदल्याची भावना वाढलेली पाहवयास मिळत आहे. जाणूनबुजून एखाद्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याला गुन्हेगारीच्या प्रकरणात गोवण्यात येते, अशी खंत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. चाळीसगाव येथील पिंपरी तांडा येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खडसे म्हणले की, जिल्ह्यात गेल्या २५ वर्षात अनेकांना राजकारणात उभं केले आहे . परंतु तेच एकनिष्ठ राहतील का नाहीत हे सांगता येत नाही. कारण एकेकाळी राजकारणात शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठा ठेवणाऱ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षात समावेश होता. आज राजकारणात निष्ठा लोप पावत चालली आहे असून सच्च्या लोकनेत्याला पाडण्यात येत आहे. काहींना उकिरड्यावरुन राजकारणात आणले. पण ते उपकार विसरुन गेले आहेत, असेही खडसे म्हणाले.

राजकारणातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारा विरोधात मी लढा दिला. तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पहात नाही. पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला हे सांगा ? मी गुन्हा केला असेल तर राजकारणातून निवृत्त होईन असेही खडसे यावेळी म्हणले.

1 Comment

Click here to post a comment