सोमय्या मुश्रीफांविरोधात उद्या ईडीकडे तक्रार नोंदवणार तर परवा केंद्रात तीन ठिकाणी पुरावे देणार

किरीट सोमय्या

मुंबई : शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री माझ्या रडारवर आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आज म्हणजेच सोमवारी यातील एका मंत्र्याचा भ्रष्टाचार माध्यमांसमोर उघडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितलं होतं. यानंतर सबंध महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये तर्क-वितर्क लावले जात होते.

अखेर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री कोण हे जाहीर केलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यासह त्यांचे पुत्र नावीद मुश्रीफ, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी या देखील या भ्रष्टाचारात सामील असल्याचं म्हटलं. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

या प्रकरणी उद्या मंगळवारी ईडीमध्ये रितसर तक्रार नोंदवणार असून परवा केंद्रातील विविध तीन यंत्रणांना याबाबतचे 2700 पानांचे पुरावे देणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.हसन मुश्रीफ आणि परिवारांनी सरसेनानी संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहे. हे मी जबाबदारीने सांगत आहे.

याबाबत उद्या मी मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. 2700 पानांचे पुरावे देणार आहे. परवा दिल्लीला फायनान्स मिनिस्ट्री, ईडी, कंपनी मंत्रालय यांच्याकडेही हे सर्व पुरावे देणार आहे. ठाकरे सरकारची डर्टी इलेव्हन घोटाळ्यात राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्याच्या फाईल तयार होत्या. आज एनसीपीच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड केला. कालांतराने दुसऱ्या मंत्र्याचा घोटाळा उघड करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :