सोमय्यांना चंद्रकांत पाटलांनी माहिती दिली मग त्यांनी माझ्यावर आरोप केले-हसन मुश्रीफ

hasan mushrif vs chandrkant patil

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतक्रिया दिली आहे. मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार आहे. असे त्यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती.’ असे ते म्हणाले आहेत.

तसेच ‘चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपतकडे तक्रार करणार. समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू. घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसा पासून याची चर्चा करत होते. म्हणून मी सुद्धा आधीच निरोप दिला होता. अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच चंद्रकांतदादांना पद मिळालं. त्यांना सामाजिक काम करता येत नाही यामुळेच त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलं आहे.’ असा घणाघात यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :