कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर, कोल्हापुरातील वातावरण तापलं असून सोमय्या यांना सोमवारी कोल्हापूरला न जाताच माघारी फिरायला लागलं होतं. मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या हे आता कोल्हापूरला जाण्यासाठी पुन्हा एकदा तयारीला लागले आहेत. २८ सप्टेंबर रोजी सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे. अशातच मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. सोमय्या यांना कोल्हापूरला येऊ द्या. त्यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक करु नका, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘सोमय्या यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपला दौरा संयमाने करावा. कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये. त्यांनी आमच्या कामाची माहिती घ्यावी. मी त्यांना वारंवार सूचना केली होती की जिल्ह्यात आमचं राजकीय, सामाजिक, सहकारात असलेल्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यातील भाजपच्या परिस्थितीही त्यांनी पाहावी,’ असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ओशो आश्रमातील गैरकारभाराची सरकारने चौकशी करावी; ओशो अनुयायांची आठवलेंकडे मागणी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार