राऊतांनी घेतलेल्या नावांविषयी उत्तर द्यायला सोमय्यांची टाळाटाळ

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनाभवन येथे पत्रकार परिषद घेतली आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल संजय राऊत यांनी देखील भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या पत्रकार परिषदेद राऊतांनी काही नावं घेतली यांच्याशी किरीट सोमय्यांचा संबंध असल्याचे बोलले होते. त्यानंतर राऊतांची पत्रकार परिषद संपताच राऊतांच्या आरोपांना उत्तर द्यायला सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी राऊतांनी घेतलेल्या नावांविषयी सोमय्यांना सवाल केले असाता सोमय्या उत्तर द्यायला टाळाटाळ करताना दिसून आले.

किरीट सोमय्यांना जितेंद्र नवलानी आणि वाधवान यांच्याशी तुमचा काय संबध आहे? असा सवाल राऊतांनी केला आहे. तुम्ही नवलानीला ओळखता का? असा प्रश्न सोमय्यांना केला असता, सोमय्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला बगल देत दुसऱ्याच विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोमय्या या प्रश्नावर उत्तर द्यायला टाळाटाळ का करत आहेत? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. त्यानंतरही पत्रकारांनी प्रश्नाचा भडीमार केल्यावर राऊतांनी घेतलेल्या नावांशी माझा काहीही संबंध नाही असे, स्पष्टीकरणही सोमय्या यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या: