सायबी टोपी घाला, हॅट घाला अथवा काहीही घाला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा- राजू शेट्टी

पुणे: सध्या पगडीवरून चांगलेच राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील वर्धापन दिनानिमीत्त आयोजित मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले पगडीनेच स्वागत करायचं, असा आदेश दिला. यावर विरोधकांनी तुफान टीका केली.

या संदर्भात बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, सायबी टोपी घाला,हॅट घाला अथवा काहीही घाला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यानी सुद्धा पगडी राजकारणावर प्रतिक्रिया दिली. “शरद पवारांना प्रतिगामी मानत नाही मात्र त्यांनी बरीच पावले प्रतिगामी उचलली आहेत.पेशवाईला आमचा विरोधच आहे. पवारांनी फुले पगडी स्वीकारली याचा आनंदच आहे.” असे ते म्हणाले.

भाजपचे उपोषण म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ राजू शेट्टी यांचे भाजपवर टीकास्त्र

राजू शेट्टी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • दुधाच्या भुकटी चे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात125 ते 140 पर्यंत पोहचले आहेत.दुधाच्या पावडरीचे साठे वाढत असल्याचे मी कृषिमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं.
  • शेतकऱ्यांनी किती दिवस तोटा सहन करायचा?लिटरला कमीतकमी 5 रुपये शेतकऱ्यांचा अकाऊंट ला जमा करावेत.महाराष्ट्रात असं जर केलं तर 900 कोटी लागतील हे सरकारला अवघड नाही.
  • ज्यांनी ज्यांनी सोलापूर जिल्हा बँकेतून गैरमार्गाने कर्ज घेतले त्या सर्वांना तुरुंगात टाका.गैरमार्गाने कर्ज घेणार्यांना तुरुंगात टाका ही आमची 10 वर्षांपासूनची मागणी आहे.

लेख – आत्महत्या नाही, हत्या होतील !