भारताला युद्ध नको , शांतता हवी – राजनाथ सिंग

नवी दिल्ली : डोकलाम प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल कारण भारताला युद्ध नाही तर शांतता हवी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज येथे केले . . इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसदलातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.आपण आपले मित्र बदलू शकतो मात्र आपले शेजारी बदलू शकत नाही,त्यामुळे शेजा-यांशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे, शेजारी राष्ट्रांबरोबर असलेली मैत्री टिकून रहावी यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी शेजारील राष्ट्रांना आमंत्रित केले होते, असेही ते म्हणाले. चीनी सैन्याने घुसखोरी किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जवानही त्यांना चोख प्रत्युत्तर देतील. ज्यावेळी मी लडाखमधील जवानांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यातील हुरुप पाहता भारतावर कोणी हल्ला केल्यास ते प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे मला जाणवले, असेही सिंग म्हणाले.