सोलापूर विद्यापीठ नामकरणासाठी तब्बल ३० नावांचा प्रस्ताव

solapur univarcity

टीम महाराष्ट्र देशा- सोलापूर विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ हेच असावे, असा ठराव सिनेट सभागृहाने केला असला तरी तब्बल ३० नावांचे प्रस्ताव सोलापूर विद्यापीठाकडे आले आहेत. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी ही माहिती दिली.

विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.सोलापूर विद्यापीठासाठी पुढे नावे सुचवण्यात आली आहेत. शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ (अॅड. गंगाधर पटणे), महात्मा बसवेश्वर किंवा सिद्धेश्वर (शिवा वीरशैव संघटना), सिद्धेश्वर (सोलापूर विद्यार्थी संघ, सतीश राजमाने), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (आमदार प्रकाश शेंडगे), लोकमाता अहिल्यादेवी होळकर (ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), राजमाता अहिल्यादेवी होळकर (जय मल्हार युवा मंच), तेजस्विनी अहिल्यादेवी होळकर (जिवा सेना, औरंगाबाद), पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर (शिवसेना, पुरूषोत्तम बरडे), साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विद्यापीठ (दलित महासंघ), द्वारकानाथ कोटणीस (एसएफआय), संत नामदेव महाराज – चरणसिंग सप्रा, महर्षी वाल्मीकी ऋषी (महादेव कोळी समाज युवक संघटना), सुशीलकुमार शिंदे (रूस्तुम कंपली यांच्या पत्रास अनुसरून शासनपत्र), भावनाऋषी विद्यापीठ (भावनाऋषी युवक संघटना), सिद्धेश्वर विद्यापीठ (आनंद मुस्तारे, सिद्धेश्वर विद्यापीठ नामांतर कृती समिती, संत रोहिदास, जनजागृती संघटना), डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (सरकार सामाजिक संस्था साेलापूर), महाराष्ट्र भूषण डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी विद्यापीठ (ज्ञानोबा तावरे).सोलापूर विद्यापीठ नावाचा प्रस्ताव पाठवला अधिसभेची नववी बैठक १५ नोव्हेंबर २०१४ रोजी झाली होती. त्यात विविध संघटनांनी दिलेली निवेदने विचारात घेता भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सोलापूर विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ असेच राहील, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता

Loading...

. तसेच २६ जुलै २००८ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या १५ व्या बैठकीत ठराव क्रमांक चारनुसारही व्यवस्थापन परिषद सोलापूर विद्यापीठाच्या सद्यस्थितीत कोणताही बदल करू नये, असा ठराव केला. या ठरावाची, प्राप्त निवेदनांची नावांची माहिती शासनाला कळवली आहे, असे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले