घनकचरा व्यवस्थापन कायदा 2016 ची अंमलबजावणी जोरात

garbage-aurangabad

औरंगाबाद – शहरामध्ये कचराकोंडी झाल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन कायदा औरंगाबादमध्ये जोरा शोरात राबवण्यात येत आहे. शहरामध्ये साचलेल्या कचऱ्यावर बायोकल्चरचा वापर करून कचऱ्यापासून होणारी दुर्गंधी व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत असून स्वच्छता निरक्षक , कार्यकारी अधिकारी घरोघरी जाउन कचरा व्यवस्थापण व कचरा विलगीकरण याची महिती देत आहेत . कचरा व्यवस्थापणविषयी जनजाग्रुती करन्यासाठी वार्ड नीहाय बैठका घेण्यात येत आहेत. शाळा , हॉटेल , कॉलेज यांना कचरा विलगीकरणबाबत माहीती देण्यात येत आहे . तसेच ज्येष्ठ नागरिक, सोसायटी सभासदाना कचरा व्यवस्थापण व कचरा विलगीकरण या संदर्भात छोटे प्रत्याशीक दाखवुन जनजाग्रुती करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरामध्ये 9 झोन पैकी झोन क्रमांक 4, 5, 6, 7, 8या मध्ये कचरा विलगीकरणाचे प्रमाण 70 ते 80 टक्के आहे.
झोन नीहाय बसणाऱ्या कपोस्टिंग पीट
झोन क्रमांक 1 मध्ये 7 कपोस्टिंग पीट असून अजून 7 कपोस्टिंग पीट बसतील अशी जागेची व्यवस्था करणार आहेत.
झोन क्रमांक 2 मध्ये 6कपोस्टिंग पीटची जागेची व्यवस्था करण्यात येणार आहे .
झोन क्रमांक 3 मध्ये 4 कपोस्टिंग पीट असून अजून 13 कपोस्टिंग पीट बसतील अशी जागेची व्यवस्था करणार आहेत.
झोन क्रमांक 4मध्ये 4कपोस्टिंग पीट असून अजून 7 कपोस्टिंग पीट जागेची व्यवस्था करण्यात येणार आहे .
झोन क्रमांक 5 मध्ये 5 कपोस्टिंग पीट असून अजून 9 कपोस्टिंग पीट बसतील अशी जागेची व्यवस्था करणार आहेत.
झोन क्रमांक 7 मध्ये 9 कपोस्टिंग पीटची जागेची व्यवस्था करण्यात येणार आहे .
झोन क्रमांक 8 मध्ये 5 कपोस्टिंग पीट असून अजून 9 कपोस्टिंग पीट बसतील अशी जागेची व्यवस्था करणार आहेत.
झोन क्रमांक 9 मध्ये 9 कपोस्टिंग पीटची जागेची व्यवस्था करण्यात येणार आहे .
घनकचरा व्यवस्थापन कक्ष कायदा 2016 ची अंमलबजावणी औरंगाबाद महानगरपालिकेने तीव्र केली असून आज गुरुवारी दि 22 मार्च रोजी प्रभाग क्र 03 अंतर्गत ऐका दवाखान्या चालक कडून रु 10,000 (दहा हजार फक्त) चे दंड आकारण्यात आले. वॉर्ड अधिकारी श्री दीपक जोशी सेंट्रल नाका ते मदनी गेट दरम्यान पाहणी करत होते तेंव्हा एका दवाखाण्यासमोर च्या रोडवर जैविक कचरा आढळून आला.  हा कचरा त्याच दवाखाण्याचे कर्मचाऱ्यांनीच टाकला याची खात्री झाल्या नंतर श्री जोशी यांनी दवाखाण्याचे मालक कडून पावती क्र 99716 अनव्य रुपये दहा हजार दंड आकारला आहे .