Share

Solar Eclipse | मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दिसणार आज खंडग्रास सूर्यग्रहण

टीम महाराष्ट्र देशा: खगोलप्रेमींना यावर्षी एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण Solar Eclipse अनुभवायला मिळाले होते. त्यानंतर आज त्यांच्यासाठी दुसरे आणि या वर्षातले अखेरचे सूर्यग्रहण पार पडणार आहे. नुकतीच दिवाळी संपलेली असून खगोल प्रेमींना आज हे खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवायला मिळणार आहे. दिवाळीच्या दीपोत्सवानंतर आता आकाशातला दीपोत्सव म्हणजेच सूर्यग्रहणाची रोशनी बघायला मिळणार आहे. दरम्यान, हे सूर्यग्रहण मराठवाड्यातील खगोल प्रेमींसाठी नित्यानंदाचे ठरणार आहे. कारण आज होणारे सूर्यग्रहण मराठवाड्यातील सर्व म्हणजेच आठही जिल्ह्यांमध्ये दिसणार आहे. एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विभाग केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथून संध्याकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी सूर्यग्रहणास स्पर्श होईल.

त्याचबरोबर आजचे हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग तसेच संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून बघायला मिळणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र ( सॅरोस) 124 क्रमांकाचे आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण

मराठवाड्यातील औरंगाबाद येथे संध्याकाळी 4.50 मिनिटांनी सूर्यग्रहास स्पर्श होईल. त्याचबरोबर आजचा सूर्यास्त ग्रहणातच होताना दिसेल. दरम्यान आजचे सूर्यग्रहण मराठवाड्यातील औरंगाबाद सह सर्व जिल्ह्यातून दिसणार आहे. एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे दिलेल्या वेळेप्रमाणे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सूर्यग्रहणाचा स्पर्श होईल.

औरंगाबाद : 4.50pm
जालना : 4.49pm
बीड : 4.52pm
उस्मानाबाद : 4:54pm
परभणी : 4.52pm
नांदेड : 4.53pm
लातूर : 4.54pm
हिंगोली : 4.51pm

सूर्यग्रहणाच्या Solar Eclipse वेळी ‘ही’ काळजी घ्या

खगोलप्रेमीसह इतर लोकांनीही या सूर्यग्रहणाचा आनंद घेत असताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघण्याचे टाळावे कारण त्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता वाढू शकते. चष्मा आणि गॉगल इत्यादी गोष्टींचा उपयोग करूनच सूर्यग्रहण बघावे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: खगोलप्रेमींना यावर्षी एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण Solar Eclipse अनुभवायला मिळाले होते. त्यानंतर आज त्यांच्यासाठी दुसरे आणि या वर्षातले अखेरचे …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now