fbpx

कॅबिनेटचा महत्वपूर्ण निर्णय; सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव

solapur univarcity

नागपूर:सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यावं, अशी मागणी धनगर समाजाकाडून सातत्याने होत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला असून, कार्यवाहीसाठी उपसमिती स्थापन करण्यात आल्याची माहिती, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी विधानपरिषदेत दिली.

गेल्या महिन्यात धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची घोषणा केली होती तर शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे, त्यामुळे सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचं नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाकडून केली जात आहे त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता .