शिवसेनेचे महेश कोठे नारायण राणेंच्या गळाला ?

सोलापूर: नारायण राणे हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता भाजपमध्ये जाणर कि नवीन पक्ष काढणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. राणे यांनी सोलापुरातील २५ नगरसेवक आपल्यासोबत येणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे हे गेल्या काही दिवसापासून भाजपत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. मात्र, आता ते राणेंच्या माध्यमातून भाजप प्रवेश करतील अस बोलल जात आहे. या संदर्भात कोठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून सेनेचे नेते भाजपच्या संपर्कात असल्याच बोलल जात. मात्र सेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख तो मी नव्हेच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे तिसरे जिल्हाप्रमुख महेश कोठे हेच तर राणेंच्या गळाला लागले नाहीत ना? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. या बाबत जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांना विचारल असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सोडणार नसल्याच सांगितल आहे.