fbpx

विद्यार्थ्यांना करावा लागणार दररोज 100 जणांना नमस्कार

सोलापूर:  दररोज किमान 100 लोकांना नमस्कार केल्याने विद्यार्थ्यांच्या अंगी विनम्रता येईल असा शोध लावत सोलापूर शिक्षण विभागाने एक नवीन फर्मान काढला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी दिवसभरात किमान 100 जणांना नमस्कार करावे असे सांगण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गटशिक्षण अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाला आता सर्व स्तरातून विरोध केला जात आहे. अशा प्रकारच्या आदेशामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विनम्रते ऐवजी विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचं मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केल जातं आहे.