संजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात

कोणता झेंडा घेऊ हाती?

करमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला…कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची परिस्थिती झालेली आहे.

आगामी करमाळा विधानसभा कोणत्याही परिस्थितीमध्ये लढविणार असल्याचे ते गेल्या चार वर्षांपासून सांगत आहेत परंतु कोणत्या राजकीय पार्टीतून लढविणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात आहेत.

मागील २०१४ विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी महायुती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविलेली होती त्या निवडणूकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ते स्वाभिमानीमध्ये कधीच दिसले नाहीत.

गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी अपक्ष लढविली आणि जिंकली मग भाजप-शिवसेना-स्वाभिमानी यांच्या मदतीने त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले परंतु आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. कधी भाजप मध्ये तर कधी शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असते तर मध्यंतरी राष्ट्रवादीतच राहणार असल्याची देखील चर्चा जिल्ह्यात रंगली होती.

आगामी करमाळा विधानसभा कुठल्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे परंतु सध्या संजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात सुरू असून कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती झाल्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

You might also like
Comments
Loading...