सोलापूर: पंचायत राज समितीला खूश करण्यासाठी वर्गणीची वसुली?

Corruption

सोलापूर-  जिल्ह्यामध्ये पंचायत राज समितीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात येत असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी दिला आहे.

Loading...

राज्याची पंचायत राज समिती ही सध्या ३ दिवसांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.पंचायत राज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे, असे म्हटल्यावर सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांकडून वर्गणी गोळा करण्यात येत असल्याची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे. मात्र, अशा प्रकारे वर्गणीचा कोणताही प्रकार घडला असेल तर त्याविरूद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सुधीर पारवे यांनी यावेळी दिला आहे.

पंचायत राज समिती दौऱ्याची माहिती मिळताच सोलापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असेलेल्या विविवध विभागाकडून वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू होते. यामध्ये अंगणवाडी मतदनीसांपासून ते कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडूनही वर्गणी गोळा करण्यात आली असल्याची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती. कर्मचारी आणि अधिकारी यांचे वर्गणीचे दरही वेगवेगळे ठरले असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषद आणि जिल्ह्यात सुरू झाली आहे.Loading…


Loading…

Loading...