मोदींच्या सभेला धनगर समाजबांधवांनी उपस्थित राहू नये : अमोल कारंडे

सोलापुर : जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी ९ जानेवारी रोजी सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित राहु नये असे आव्हान अमोल कारंडे यांनी केले आहे.

धनगर समजला भाजप सरकारने फसवले आहे. अनेक दिवसांपासूनच्या मागण्या सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत.
त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिले गेले नाही. त्यासोबतच नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथेच धनगर बांधवांना आरक्षण देतो असे म्हटले होते. तोही शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलेला नाही. या प्रमुख कारणामुळे धनगर समाज बांधवांनी मोदींच्या सभेवर पुर्णपणे बहिष्कार टाकावा असे आव्हान अमोल कारंडे यांनी केले आहे.

त्यामध्ये सोलापूर जिल्हयातील धनगर समाजाची लोकसंख्या अक्कलकोट ३५०००, बार्शी : ४३०००, करमाळा : ६८०००, माढा : ५५०००, माळशिरस : ६५०००, मंगळवेढा : ४१०००, मोहोळ : ५२०००,पंढरपूर : ६१०००, सांगोला : ७४०००, उत्तर सोलापूर : ४००००, दक्षिण सोलापूर : ५३००० अशी आहे.

You might also like
Comments
Loading...