सोलापूरची महापालिका उच्चांकी 500 कोटी रुपयांच्या बोजाखाली

सोलापुरकरांवर दरडोई ५२५७ रुपयांचा बोजा

सोलापूर:स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर महापालिकेवर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून शहरातील विकास कामे तर थांबली अाहेतच पण जमा बाजूचे अर्थकारण कमकुवत झाल्याने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ५०० कोटींची देणी महापालिकेला होऊन बसली अाहेत. ती कशी द्यायची याची चिंता अायुक्तांना लागून राहिली अाहे. शहराची लोकसंख्या ९.५१ लाख असून त्यानुसार हा बोजा पाहता दरडोई ५२५७ रुपये बोजा पडतो. ही रक्कम वाढतच चालली अाहे. नागरिकांनी मनपाची थकीत रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

महापालिकेच्या जमा अाणि खर्चाच्या बाजूचा मेळ बसत नसल्याने महापालिकेची अार्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली अाहे. यावर उपाय म्हणून महापालिका आयुक्तांनी डिसेंबर महिन्यात वसुली मोहीम सुरू केली तर मागील दोन वर्षाची कामे थांबवली आहेत. पण त्याचाही फारसा परिणाम दिसत नाही. महापालिका निवडणुकीपूर्वी कामाचा सपाटा लावल्याने देणी वाढवली गेली. त्यानंतर मागील अायुक्तांनी धडाधड टेंडर प्रक्रिया राबवून चुकीचे निर्णय घेतल्याची चर्चा अाहे. या एकूणच चुकीच्या कामाचा परिणाम म्हणून अशा मंजुरीतून झालेल्या कामांच्या दर्जाबाबत आता शंका उपस्थित होत आहेत. खर्च झालेले पैसे मिळत नाहीत म्हणून देखभाल दुरुस्तीसह सर्व प्रकारच्या मक्तेदारांनी कामेही थांबवली आहेत. त्यामुळे नवीन विकास कामेही ठप्प झाली अाहेत.अशी अाहेत देणी (कोटीत)- १२० मनपासेवक सेवानिवृत्ती सेवकांची देणी – ०२ प्राथमिक शिक्षण मंडळाकडील सेवकांची देय रक्कम मनपा हिश्श्यापोटी – ८ महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजना ३० टक्के हिस्सा – २५ महाराष्ट्र सुवर्ण नगराेत्थान योजना वाढीव खर्च – १०० स्मार्ट सिटी मनपा हिस्सा दोन वर्षाचे – २८ शासकीय कर्ज व्याजासह – १९० महापालिका मक्तेदारांची देणी – २७ इतर- ५०० एकूणमनपावर ५०० कोटी देणी असून, येणे रक्कम वसूल करण्यासाठी वसुली सुरू करत आहोत.

You might also like
Comments
Loading...