सहकारमंत्र्यांचा अनधिकृत बंगला; सुनावणीवेळी मनपा आयुक्तच गैरहजर

solapur-municipal-commissioner-absent-for-hearing-of-minister-shubhash-deshmukh-bungalow

सोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूरमधील अलिशान बंगला महापालिकेच्या आरक्षित जागेवर बांधण्यात आल्याची तक्रार महेश चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे.

आज याच संदर्भात खुद्द देशमुख यांना सुनावणीवेळी हजर राहण्यास सांगण्यात आल होत. मात्र या सर्व प्रकरणाची सुनावणी घेणारे महापालिका आयुक्तच गैरहजर राहिल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

अग्निशमन दलासाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर सुभाष देशमुख यांनी अलिशान बंगला बांधल्याचे प्रकरण सध्या सोलापूरमध्ये गाजत आहे.  देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बेकायदा बांधकामा विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी देशमुख यांना आज म्हणजे १७ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र खुद्द महापालिका आयुक्त आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख हेही सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे