पुणेकरांसाठी अस्सल सोलापुरी खाद्यपदार्थांची मेजवानी..!

blank

पुणे: संपूर्ण देशभरात सोलापूर शहर ओळखल जात ते सुप्रसिद्ध चादरींसाठी. मात्र या चादरींसोबतच अजून एक स्पेशल गोष्ठ आहे ती म्हणजे सोलापूरी खाद्यपदार्थ, मग ते व्हेज असो की नॉनव्हेज. सोलापूर हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने दोन्ही राज्यांच्या खाद्य संस्कृतीचा प्रभाव येथील पदार्थांमध्ये दिसून येतो. यामध्ये खास सोलापुरी चटणी आणि कडक भाकरी म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ. तसेच स्पेशल साउजी चिकन तर नॉनव्हेज खवय्यांसाठी ठसकेबाज मेजवानीच.

आता हे सर्व खायचं म्हणल्यावर सोलापूरला जाव लागणार का ? तर नाही, कारण २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ‘सोलापूर सार्थक सोहळ्या’त अस्सल सोलापुरी खाद्यपादार्थांची मेजवानी आपल्याला मिळणारे आणि तेही पुण्यामध्येच. सोबतच सोलापूरमधील शेतकऱ्याच्या शेतातून आलेला चवदार हुरडाही येथे उपलब्द असणार आहे.

२ ते ४ फेब्रुवारी दरम्यान स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे सोलापूर सार्थक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूरच्या खाद्य संस्कृतीची चव देणाऱ्या स्टॉलसह अनेक नामांकित शिक्षण संस्था, बांधकाम व्यवसायिक. अनेक वस्त्रोद्योग उत्पादक, चादरी टॉवेलचे स्टॉल देखील असणार आहेत. सोलापुर जिल्ह्यातून पुणे शहरात येवून स्थायिक झालेल्यांची संख्या जवळपास ५ ते ६ लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे हा सार्थक सोहळा म्हणजे एकप्रकारे जन्मभूमी आणि कर्मभूमीचा स्नेह मिलाप ठरणार असल्याच आयोजक लक्ष्मीकांत गुंड यांनी सांगितले.

सोलापुरचे प्रसिद्ध चित्रकार राम खरटमल यांचे चित्रप्रदर्शन आणि प्रकट मुलाखत, तसेच हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ. राजशेखर पंचे आणि त्यांच्या टीमचा सदाबहार नृत्याविष्कार देखील यावेळी अनुभवायला मिळणार आहे.