भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी ; बंडखोरीची शक्यता

सोलापूर : आगामी लोकसभेला काही महिन्यांचा अवधी असला तरी सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली असून ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Rohan Deshmukh

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार शरद बनसोडे आगामी लोकसभा लढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर राज्यसभा खासदार अमर साबळे आणि बांधकाम व्यावसायिक राजेश मुगळे यांनी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केल्यामुळे भाजप मध्ये इच्छुकांची वाढ झालेली आहे.

आगामी लोकसभेला सोलापूर मतदारसंघावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असून एकेकाळी कॉंग्रेस चा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर मतदारसंघावर सध्या भाजप ची पकड आहे मागील २०१४ लोकसभेला मोदी लाटेत विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता, तसेच सध्या सोलापूर मतदारसंघात दोन मंत्री असून महानगरपालिकेवर ही भाजप ची सत्ता आहे, आगामी लोकसभेला ही जागा भाजप जिंकेल असा विश्वास असल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे कुणाला उमेदवारी मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यता ही नाकारता येणारा नाही.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...