fbpx

सोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभेला सोलापूर मतदारसंघावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असून एकेकाळी कॉंग्रे चा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर मतदारसंघावर सध्या भाजपची पकड आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे नाव वरिष्ठ स्तरावरून फायनल झाल्याचे समजते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ढोबळे यांनी यासठी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी ढोबळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आशीर्वाद घेतले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही केला होता. ढोबळे हे अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याचे ही समजते आहे. ढोबळे हे भाजपच्या गोटात वावरत असल्याचे बर्याचदा दिसून आले आहे. ढोबळे यांनी फिल्डिंग लावून सोलापूर लोकसभेचे तिकीट एका बड्या नेत्याकडून फिक्स केले असल्याची माहित विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1951 ते 2014 या कालावधीत एका पोटनिवडणुकीसह झालेल्या 17 निवडणुकांत तब्बल 12 वेळा या मतदार संघातून कॉंग्रेसचे खासदार झाले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. मोदी लाटेत भाजपचे ऍड. शरद बनसोडे यांचा अनपेक्षित विजय झाला होता.

शोध व्यक्तिमत्वाचा