सोलापूर विद्यापीठ नामांतरण: पालकमंत्री विजयकुमार देशमुख आहेत कुठे ?

vijaykumar deshmukn

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरनाचा वाद पुन्हा एकदा उफाळून येणार असल्याच दिसत आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र आता अहिल्याबाई होळकर यांच्या नामकरणाचा फेरविचार करण्याची नामुष्की सरकारवर आल्याच दिसत आहे. कारण सोलापूर विद्यापीठाला नेमके कोणते नाव द्यावे याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापण करण्यात आली आहे. हि समिती विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, समाजातील विविध घटकांनी सुचवलेल्या नावांवर चर्चा करणार आहे. दरम्यान, हे सर्व होत असताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख नेमके आहेत कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे.

Loading...

नामांतरन संदर्भात सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीमध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे हे अध्यक्ष असणार आहेत. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे सदस्य असतील. पण यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांना लिंगायत नेते म्हणून बघितले जाते त्या विजयकुमार देशमुख यांना कोठेही स्थान देण्यात आलेलं नाही. एका बाजूला धनगर आरक्षणावर सपशेल तोंडावर पडलेल्या भाजप सरकारने समाजाचा रोष थोपवण्यासाठी कोणतीही प्रक्रिया न राबवता सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे जाहीर केले. मात्र दुसरीकडे हे होत असताना गेली अनेक वर्ष विद्यापीठाला सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरांचे अथवा महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याची मागणी करणाऱ्या लिंगायत समाजाला विचारात घेतले नाही. यावेळीही विजयकुमार देशमुख यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा रोष लिंगायत समाजामध्ये आहे.

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे जाहीर होताच, राज्यभरात त्यांचे पुतळे जाळत लिंगायत समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी देशमुख यांच्यावरही टीका केली गेली. आता नामकरणाचा अधिक विचारविनिमय करण्यासाठी मंत्री गटाची समिती स्थापन करण्याची खेळी सरकारकडून खेळण्यात आली आहे. याला कारण म्हणजे कर्नाटकातील निवडणुका आणि तेथील लिंगायत बहुल राजकारण, कर्नाटकची सत्ता मिळवायची असल्यास भाजपला लिंगायत समाजाचा पाठींबा गरजेचा आहे. त्यामुळे विद्यापीठ नामांतराचा फेरविचाराचा मुद्दा पुढे करून दुखावलेला लिंगायत मतदार पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. हे सर्व होत असताना लिंगायत नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मात्र कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे देशमुख यांनी पुढे येवून त्यांची आणि पक्षाची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट करण्याची नितांत आवश्यकता आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता यावर बोलण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली आहे.

विजयकुमार देशमुख हे सत्तेची हवा लागल्याने मागील काही महिन्यांपासून लिंगायत समाजा विरोधात भूमिका घेत आहेत. ज्यांच्या पाठींब्याने आपण मोठे झालो त्या समाजालाच आज दुर्लक्षित करण्याच काम त्यांच्याकडून केल जात आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरनाच्या विषयातही त्यांची दुट्टपी भूमिका उघड होत आहे. त्यामुळे येत्या काळात समाजच त्यांना जागा दाखवून देईल. – मनोहर धोंडे सर. संस्थापक अध्यक्ष शिवा संघटनाLoading…


Loading…

Loading...