fbpx

सोलापूर : तीन वर्षासाठी खेडगीज परीक्षा केंद्र झाले रद्द, प्राचार्यासह तिघांना दीड लाखांचा दंड

सोलापूर – अक्कलकोट येथील सी. बी. खेडगीज महाविद्यालय परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका फोडली गेल्याची वस्तुस्थिती विविध चौकशी समितीने विद्यापीठासमोर मांडली गेली आहे. त्यास अनुसरून या परीक्षा केंद्राची मान्यता तीन वर्षासाठी काढण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी दिली.

परीक्षेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने ई मेलवर आलेली प्रश्नपत्रिका या परीक्षा केंद्रातील प्राचार्य व शिपाई आणि प्रयोगशाळा परिचर यापदावरील मंडळींनी प्रिंट काढली. त्याची प्रत मोबाईलद्वारे वॉटसअॅपवर व्हायरल केली. आणि तमाम विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला. परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका अनेकांच्या वॉटसअॅपवर आढळली. ही बाब विद्यापीठापर्यंत पोहचताच, तातडीने ही परीक्षा रद्द केली गेली. हा प्रकार १७ डिसेंबर रोजी बी कॉमच्या परीक्षेतील कार्पोरेट अकौंटिंग या विषयाबाबत उघड झाला होेता. यानंतर ही परीक्षा २३ डिसंेबर रोजी पुन्हा विविध केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेस चार हजारहून जास्त विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

आता सी. बी. खेडगीज महाविद्यालयात परीक्षा केंद्र रद्द . येथील परीक्षा यंत्रणेतील प्राध्यापक, व इतरांना सोलापुरात नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर कार्य करावे लागेल.

तीन वर्षासाठी केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली. प्रभारी प्राचार्य एस. सी. आडवितोट, लिपीक कुंभार, प्रयोगशाळा सहाय्यक भंगे हे तिघेही प्रश्नपत्रिका फाेडण्याच्या प्रक्रियेत दोषी, प्रत्येकाकडून ५० – ५० हजार रूपये अशी एकूण १.५० लाख रूपयांचा आर्थिक दंड पोलिसांच्या सायबर सेलकडे एमआयआर दाखल करण्याचे प्राचार्यांना आदेश एफ आय आर दाखल न केल्यास संस्थेला मान्यता का काढण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार

प्रभारी प्राचार्य एस. सी. आडवितोट, लिपीक कुंभार, प्रयोगशाळा सहाय्यक भंगे हे तिघेही प्रश्नपत्रिका फाेडण्याच्या प्रक्रियेत दोषी, प्रत्येकाकडून ५० – ५० हजार रूपये अशी एकूण १.५० लाख रूपयांचा आर्थिक दंड पोलिसांच्या सायबर सेलकडे एमआयआर दाखल करण्याचे प्राचार्यांना आदेश

एफ आय आर दाखल न केल्यास संस्थेला मान्यता का काढण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार.प्रश्नपत्रिका या परीक्षा केंद्रावरून फुटल्याने या महाविद्यालयाकडून आता पुनपर्रीक्षेचा संपूर्ण खर्च साधारण १ लाख ७१ हजार ९२१ रूपये हा खर्च महाविद्यालयाने भरायचा आहे.. दोषी आढळलेल्या प्रभारी प्राचार्यासह तिघांना परीक्षा कामकाजातून कायमस्वरूपी डिबार करण्यात आले . दोषी प्रभारी प्राचार्यांची मान्यता कायमस्वरूपी काढून घेण्यात आली व पदावरून काढून टाकण्यात आले.