सोलापूर महोत्सवाचे फेब्रुवारी मध्ये मुंबईत आयोजन – सहकरमंत्री सुभाष देशमुख

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या विविध वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी आम्ही  सोलापूर मध्ये कार्यरत आहोत. तसेच यापुढे सोलापूर महोत्सवाचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. येत्या १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान खारघर, मुंबई येथे सोलापूर महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूरची श्रीमंती दाखविण्याचे काम सोलापूर सोशल फाउंडेशन करणार असल्याची माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते.सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन, कृषी, व्यापार, उद्योग, दळणवळण, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत. या वैशिष्ट्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन कार्यरत आहे. सोलापुरात उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना सोलापूर बाहेर बाजारपेठ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजपर्यंत अनेक उपक्रम राबवून सोलापूर सोशल फाऊंडेशनने सोलापूरच्या विकासाला चालना दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात पुणे येथील पंडित फार्म मध्ये सोलापूर फेस्ट आयोजित केले होते. त्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने मूळचे सोलापूरकर आणि पुणेकर भारावून गेले. सोलापुरातील उत्पादकांना, व्यावसायिकांना या महोत्सवाचा लाभ झाला. त्यामुळे आता सोलापूरचे मार्केटिंग सोलापूर बाहेर करण्यासाठी मुंबईत येत्या 1,2,3 फेबरुवारी मध्ये सोलापूर महोत्सव भरविण्यात येणार आहे.

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या स्थापनेनंतर सुरुवातीला मुंबई येथे नोकरी व व्यवसायनिमित्त वास्तव्य करणाऱ्या मुळ सोलापूर जिल्ह्यातील मान्यवरांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर अशा प्रकारची बैठक नवीमुंबई व पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी या जिल्ह्यात घेण्यात आली. या सर्व बैठकीस उपस्थित असलेल्या मान्यवरांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत काही महत्त्वपूर्ण सुचना केल्या होत्या.
त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील विविध उत्पादनांचे ब्रॅडींग करण्यासाठी व या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सोलापूर महोत्सव मोठ्या दिमाखात भरवले गेले. सोलापूर , सोलापुरातील लेखकांची पुस्तके आदींचा समावेश या महोत्सवात होणार आहे. यावेळी सल्लागार प्रा. देवानंद चीलवंत, प्रा. नरेंद्र काटिकर , मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले, कार्यक्रम अधिकारी राहुल जाधव यांची उपस्थिती होती.