शिवसेना निवडणुकीच्या तोंडावर सुस्त अवस्थेत

सोलापुर : सोलापुर जिल्हा शिवसेना निवडणुकीच्या तोंडावर सुस्त अवस्थेत पाहवयास मिळत आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. बदल झाल्यानंतर संपूर्ण जिल्हा भगवामय होणार अशी चर्चा चालू झाली. परंतु तेंव्हापासून अद्याप पर्यंत जिल्ह्यातील शिवसैनिक फक्त वेट अँण्ड वॉचच्या भुमीकेत दिसत आहे. त्यामुळे शिवसैनिकांना वेट अँण्ड वॉच करून सुस्ती चढल्याचे दिसत आहे.

Loading...

काही दिवसांपूर्वी डॉ. तानाजी सावंत यांनी संपर्क प्रमुख पदभार स्वीकारला आहे. नुतन संपर्क प्रमुख पदभार स्वीकारल्यापासून कोटी रुपये पक्षासाठी खर्च केले जाणार असल्याच्या चर्चा शिवसैनीक ऐकुन तल्लीन आहेत.  परंतु नुतन संपर्क प्रमुख डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून अजूनही  विधानसभा निहाय ना कुठला कार्यक्रम, ना कुठला अजेंडा, ना कुठली बैठक असे चित्र जिल्ह्यामध्ये दिसत आहे. त्याच्याच उलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे विधानसभेसाठी व लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढताना दिसत आहे.  ज्या पक्षाकडे उमेदवारीसाठी जास्त इच्छुक म्हणजे तो पक्ष सुदृढ अवस्थेत असणे असे मानले जाते.

शिवसेनेची सोलापूरची परिस्थिती पहिली तर जास्त इच्छुक दिसत नाहीत किंवा तशी चर्चा हि होताना दिसत नाही.  जे उमेदवार इच्छुक आहेत ते संपर्क प्रमुखांच्या परस्पर मातोश्री गाठतात किंवा संपर्क प्रमुखाच्या ‘खास ‘मर्जीतला, सगा सोयरा गाठता असे नसेल तर सेनेच्या दरबारात टिकणार नाही अशी अवस्था सोलापुर जिल्हा शिवसेनेची सध्या दिसत आहे.

सोलापुर शिवसेनेचे संघटणात्मक निर्णय आता पुण्यातल्या कात्रज येथुन होत असल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे पक्षनेतृत्वाने याबाबत वेळीच दखल घेतली नाही तर पक्षालाच ‘कात्रज चा घाट ‘पहाण्याची वेळ येईल असे शिवसैनीक बोलत आहेत.Loading…


Loading…

Loading...